दिनांक 22 September 2019 वेळ 4:52 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » फरळेपाड्यात निवासी बाल आनंद मेळावा संपन्न!

फरळेपाड्यात निवासी बाल आनंद मेळावा संपन्न!

NIVASI BAL AANAND MELAVA1प्रतिनिधी/जव्हार, दि. 30 : तालुक्यापासुन साधारणतः 10 कि.मी. अंतरावर असलेल्या जिल्हा परिषदेच्या धानोशी केंद्रातील सोलर डिजिटल प्राथमिक शाळा फरळे पाडा येथे नुकताच निवासी बाल आनंद मेळावा पार पडला. मेळाव्यात धानोशी केंद्रातील 13 व वाळवंडा केंद्रामधील एक अशा एकुण 14 शाळा सहभागी झाल्या होत्या. यात इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतचे 478 विद्यार्थी सामिल झाले होते. या विद्यार्थ्यांनी मेळाव्याचा मनमुराद आनंद लुटला.

निवासी बाल आनंद मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे शालेय विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील मनावरील असलेला अभ्यासक्रमाचा मानसिक ताण तणाव दूर करुन विरंगुळा मिळावा व त्यांच्यातील अंगीकृत सुप्त कलागुणांना वाव देणे हा होता, असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले. मेळाव्याचे उद्घाटन जव्हार पंचायत समितीच्या सभापती अर्चना भोरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखा थेतले, धानोशीचे सरपंच अरुणा मोहंडकर, कल्याणचे सहाय्यक पोलिस निरिक्षक गणपत तुंबडा, तसेच सर्व ग्रामपंचायतींचे सदस्य व पंचायत समिती केंद्रप्रमुख यांच्या उपस्थितीत झाले. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी खाऊचे स्टाँल, त्यात भेळीची दुकाने, विज्ञान प्रयोग, जादुचे पत्ते व वारली चित्रशैलीच्या कलाकृती मांडल्या होत्या. मनोरंजक खेळांमध्ये गाण्याच्या भेंड्या, चालता-बोलता असे कार्यक्रम घेतले गेले. या कार्यक्रमाला मनोहर महाले, विठ्ठल थेतले, सखाराम पवार यांनी भेटी दिल्या. संध्याकाळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात नकला, नाटके व गाणी सादर केली. या कार्यक्रमावेळी जव्हारचे गटशिक्षणाधिकारी कासले, दै. सकाळचे पत्रकार नामदेव खिरारी, समस्त ग्रामस्थ व शिक्षक वर्ग उपस्थित होता.

NIVASI BAL AANAND MELAVA2बाल मेळाव्याच्या दुसर्‍या दिवशी सरळगावचे जादूगार वायडा यांनी मुलांना जादुचे खेळ दाखविले. त्यातुन जादुतील विज्ञानाचा दृष्टिकोन, हात चलाखी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. या मेळाव्यात फरळे पाडा, आखर, चोथ्याची वाडी, काळीधोंड, अळीव माळ, केळीचा पाडा, आपटाळे, घोरपट-टेप, ताडाची माती, जुनी जव्हार, कातकरी पाडा, धानोशी, खडकीपाडा, आदी शाळा सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यासाठी मुंबईतील गोरगाव येथील युवा मोरया ग्रुपचे व सहभागी शाळांच्या शिक्षकांचे मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी होण्यास धानोशी केंद्रप्रमुख किरण रोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व भरत कासले, गणपत तुंबडा, केंद्रप्रमुख किरण घोलप तसेच बाळू तुंबडा, शंकर सवरा व फरळे पाडा ग्रामस्थांनी प्रयत्न केले.
फरळे पाडा शाळेचे शिक्षक विजय निमसे व त्यांचे सहकारी सुदाम काळे यांच्या संकल्पनेतुन व केंद्रातील शिक्षक कर्मचारी वृंद, फरळे पाडा ग्रामस्थ यांच्या प्ररणेने आयोजित हा निवासी बाल आनंद मेळावा यशस्वीपणे साकार झाला.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top