दिनांक 22 September 2019 वेळ 4:51 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » चिकू फेस्टिव्हलचे 24 लाख रुपयांचे सरकारी अनुदान वादाच्या भोवऱ्यात

चिकू फेस्टिव्हलचे 24 लाख रुपयांचे सरकारी अनुदान वादाच्या भोवऱ्यात

RAJTANTRA MEDIA

दि. 29: बोर्डी येथे येत्या 2 व 3 फेब्रुवारी होणाऱ्या चिकू फेस्टिव्हलसाठी आदिवासी विकास विभागाकडून प्राप्त होणारे 25 लाख रुपयांचे अनुदान वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. इतके मोठे अनुदान प्राप्त झालेले असताना आयोजकांनी प्रत्येक स्टॉल साठी 5,900 ते 14,160 हजार रुपये आकारले. इतके भाडे स्थानिक लोकांच्या आवाक्याबाहेर गेल्यामुळे पहिली ठिणगी पडली व काही लोकांनी चिकू फेस्टिव्हलच्या बाहेरील जागेवर स्टॉल उभारण्यास परवानगी मागितली. तसेच जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांची भेट घेऊन महोत्सवाचे व्यापारीकरण केल्याची तक्रार केली आहे. यातून महोत्सवाला मंजूर झालेले अनुदान गोठवले जाण्याची शक्यता आहे.

या महोत्सवातून स्थानिक कलाकार व कला संस्कृतीचे दर्शन घडविणे अपेक्षीत असताना व स्थानिकांना भविष्यात पर्यटन क्षेत्रातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे प्रयत्न करणे आवश्यक असताना वारेमाप उधळपट्टी करुन अस्थानीय व्यावसायिकांचे उखळ पांढरे केले जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. महोत्सव स्थानिकांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. केवळ काही रिसॉर्ट मालकांचे हीत जोपासले जात असल्याचा आरोप होत आहे. गेल्या वर्षी देखील महोत्सवाला 5 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते.

चिकू फेस्टिव्हलमध्ये सरासरी 100 रुपये चौरस फूट या दरा प्रमाणे 8 फूट×8 फूट व 10 फूट ×8 फूट या आकाराचे एकूण 152 स्टॉल्स उभारले जाणार असून त्यातील अवघे 14 स्टॉल्स चिकू फळ व स्थानिक भाजीपाला यासाठी उपलब्ध आहेत. स्टॉल विक्री पासून आयोजकांकडे 20,53,790 रुपये जमा होणार आहेत. दरपत्रकामध्ये महिला बचतगट, आदिवासी यांच्यासाठी सवलत उपलब्ध नाही. वारली चित्रकलेसारख्या कलांसाठी देखील सवलतीमध्ये स्टॉल उपलब्ध नाहीत.

असे आहे चिकू फेस्टिव्हलच्या स्टॉल्सचे दरपत्रक:

चिकू महोत्सवाविषयीचे प्रमुख आक्षेप:

  • आयोजकांनी स्थानिकांना संधी उपलब्ध होण्यासाठी पुरेशी प्रसिद्धी केलीच नाही.
  • स्थानिकांना विश्वासात घेतले जात नाही.
  • यातून आदिवासींच्या विकासासाठी काहीही साध्य होत नाही.
  • अनुदान प्राप्त होत असताना त्याच्या विनियोगाबाबत लेखाजोखा जाहीर केला जात नाही.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?

  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top