दिनांक 22 September 2019 वेळ 5:13 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले उच्च न्यायालयाचे कामकाज

दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवले उच्च न्यायालयाचे कामकाज

DANDEKAR SHETRABHET

वार्ताहर/बोईसर, दि. 28 : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या विधी महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पायल चोलेरा यांच्या पुढाकाराने मुंबई उच्च न्यायालय येथे क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 120 विद्यार्थांसह महाविद्यालयाच्या प्राध्यापिका अ‍ॅड. दिशा तिवारी, अ‍ॅड. उत्कर्षा जुन्नरकर, अ‍ॅड. राधा मल्होत्रा यांनी मुंबई उच्च न्यायालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान उच्च न्यायालयाचे वास्तू संग्रहालय व कोर्टापूढे चालु असणार्‍या प्रकरणाचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना घेता आला.

मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना 1862 साली झाली. त्या काळी इंग्रजांनी बांधलेली भव्य न्यायालयाची वास्तू, तिची रचना तसेच इंग्रजांच्या काळी असलेली न्यायालयाची कामकाजाची पद्धत व आजची पद्धत याबाबत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. या क्षेत्रभेटीच्या माध्यमातून प्रथमच जनतेच्या हितासाठी न्यायदान करणार्‍या उच्च न्यायालयाचे कामकाज व व्यवस्थापनाच्या उत्कृष्ट पद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थांना घेता आला. तसेच न्यायालयातील विविध समृद्ध ग्रंथालयातील पुस्तकांची मांडणी पाहता आली.

दरम्यान, सेंट्रल हॉल जेथे लोकमान्य टिळकांचा खटला चालला अशी ऐतिहासिक वास्तु पाहण्याची संधी देखील यावेळी विद्यार्थ्यांना मिळाली. यावेळी टिळकांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. या क्षेत्रभेटीला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला व अशा विविध क्षेत्रभेटीचे आयोजन केले जावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top