दिनांक 22 September 2019 वेळ 5:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » बोईसरमध्ये चार दिवसीय कलाक्रीडा महोत्सव संपन्न!

बोईसरमध्ये चार दिवसीय कलाक्रीडा महोत्सव संपन्न!

>> डॉ. स. दा. वर्तक विद्यालयाने पटकावला प्रतिष्ठेचा डॉ. स. दा. वर्तक स्मृतीचषक

BOISAR KRIDA MOHOSTAVवार्ताहर/बोईसर, दि. 28 : महाराष्ट्र स्पोर्टस् एज्युकेशन अ‍ॅकॅडमी, तारापूर मार्फत आयोजित चार दिवसीय कलाक्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यावेळी डॉ. स. दा. वर्तक विद्यालयाने सर्वाधिक पारितोषिके पटकावत प्रतिष्ठेचा समजल्या जाणार्‍या डॉ. स. दा. वर्तक स्मृतीचषकावरही आपले नाव कोरले.

24 ते 27 जानेवारी अशा चार दिवसाच्या कालावधीत खोदाराम बाग येथील डॉन बॉस्को स्कूलच्या मैदानावर महाराष्ट्र स्पोर्टस् एज्युकेशन अ‍ॅकॅडमीच्या या 14 व्या बोईसर कला क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात एकूण 163 स्पर्धा घेण्यात आल्या. यात 137 शाळांमधून 18 हजार 379 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

कला विभागात प्राथमिक गटात डॉन बॉस्को स्कूल तर माध्यमिक गटात डॉ. स. दा. वर्तक विद्यालय या शाळांनी विजेतेपद पटकावले. तसेच क्रीडा विभागात प्राथमिक गटातून छेदिसिंह ठाकूर आश्रमशाळा (साखरे) तर माध्यमिक गटातून सेवा आश्रम विद्यालय (बोईसर) या शाळांनी विजेतेपद पटकावले. उत्कृष्ट सहभागाबद्दल यु. एस. ओस्तवाल अकॅडमी स्कूल व चिराग विद्यालय शाळेला तर शिस्तबद्ध सहभागाबद्दल आत्मा मालिक स्कूल (अंभई) व सेवा आश्रम विद्यालय (मुरबे) शाळेला गौरविण्यात आले. या महोत्सवात प्रतिवर्षी देण्यात येणारा क्रीडा श्री पुरस्कार कराटे प्रशिक्षक जितेंद्र पाटील यांना तर कला श्री पुरस्कार स. तु. कदम विद्यालयातील कला शिक्षक प्रफुल्ल घरत यांना देण्यात आला.

दरम्यान, महोत्सवात महत्वाचे योगदान देणारे सुधाकर ठाकूर, नीता संखे, आशिष पाटील, सतेंद्र यादव, जब्बीर खान, आनंद मेहकर, सागर मोरे व पौर्णिमा कुंभार यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र स्पोर्टस् एज्युकेशन अ‍ॅकॅडमीचे अध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष डॅरल डिमेलो, उपाध्यक्ष गजानन देशमुख, ब्रँडन आल्मेडा, हेमंत मुंजे, सचिव प्रा. संजय घरत व खजिनदार उमेश शेट्टी यांच्यासह राम पाटील, राकेश सावे, शाम संखे, महेंद्र भोणे व सर्व कार्यकर्त्यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top