दिनांक 22 September 2019 वेळ 5:50 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू तालुक्यात आणखी दोन भूकंपमापन यंत्र बसविले

डहाणू तालुक्यात आणखी दोन भूकंपमापन यंत्र बसविले

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

वार्ताहर/बोईसर, दि. 28 : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वारंवार घडणार्‍या भूकंपाच्या घटनांची दखल घेऊन भारतीय हवामानशास्त्र विभागाने तालुक्यात नव्याने दोन भूकंपमापन यंत्र (सेस्मोमीटर) बसविले आहे. यामुळे भूकंपाचा तपशील जलद गतीने व अधिक अचूकतेने मिळण्यात मदत होणार असून तालुक्यात एकंदर तीन भूकंपमापन यंत्र कार्यरत झाली आहेत.

पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी भागात नोव्हेंबर 2018 पासून वारंवार भूकंपाचे धक्के बसत असून आतापर्यंत 2.5 ते 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचे 11 लहान-मोठे धक्के या परिसरात बसले आहेत. डहाणु आणि तलासरीत बसणार्‍या भूकंपाची तीव्रता जाणून घेण्यासाठी गेल्या डिसेंबर महिन्यात धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटल येथे भूकंपमापन यंत्र बसवण्यात आले आहे. यानंतर काही दिवसांपुर्वी डहाणू तालुक्यात 2 वेळा भूकंपाचे धक्के बसले. यावेळी लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले तरी धुंदलवाडी येथे बसविलेल्या भूकंपमापन यंत्रात त्याची नोंद होत नसल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे वारंवार बसणार्‍या या भूकंपाच्या धक्क्यांचा अधिक विस्तृतपणे अभ्यास करता यावा तसेच बसलेल्या धक्क्यांची माहिती जलद गतीने उपलब्ध व्हावी याकरिता भारतीय हवामानशास्त्र विभागाने आता जामखेड डोंगरीपाडा येथील अंगणवाडी तसेच आचार्य भिसे शाळेच्या प्रयोगशाळेत नव्याने भूकंपमापन यंत्र बसविल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या दिल्ली येथील शास्त्रज्ञांनी जिल्ह्याचा दौरा करून दोन दिवसांपुर्वी नवीन यंत्र बसवल्याचे सांगण्यात आले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top