दिनांक 25 May 2020 वेळ 12:40 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पालघर येथे विद्यार्थी-प्रशासन परिसंवाद संपन्न 

पालघर येथे विद्यार्थी-प्रशासन परिसंवाद संपन्न 

IMG-20190127-WA0017राजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर, दि. 26:  आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विद्यार्थी आणि प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख यांच्यात परिसंवाद घडवून आणण्यात आला. या परिसंवादात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर समर्पक उत्तरे देऊन त्यांचे समाधान करण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून आयोजित या कार्यक्रमात त्यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर तसेच सर्व विभागांचे जिल्हा कार्यालय प्रमुख उपस्थित होते. पालघर शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांनी जिल्हास्तरीय शासकीय यंत्रणेची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. जिल्हाधिकारी हे 250 हून अधिक विविध समित्यांचे अध्यक्ष असतात तसेच 180 कायद्यांची अंमलबजावणी त्यांना करावी लागते. सर्व विभागांच्या समन्वयाने जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी नियोजन करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणा काम करते, अशी माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी केंद्र आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासनात यावे असे आवाहन त्यांनी केले. विविध विभागांमार्फत जिल्ह्यात सुरू असलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली.
जिल्हा परिषदेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन करताना श्री. बोरीकर यांनी जिल्हा परिषद ही ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले. आवश्यकतेनुसार स्थानिक प्रशासनामार्फत निर्णय घेतले जावेत या उद्देशाने या स्थानिक स्वराज्य संस्थेची त्रिस्तरीय रचना करण्यात आली असून मूलभूत गरजा भागविण्यासाठी ही यंत्रणा सहाय्यभूत ठरत असल्याचे ते म्हणाले. तर, गौरव सिंग यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा 24 तास उपलब्ध असल्याचे सांगून कोणतेही भय, दबाव न बाळगता विद्यार्थ्यांनी आपले करीअर करावे, असा सल्ला दिला.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top