दिनांक 21 April 2019 वेळ 3:57 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » दुचाकी अपघातात बालकाचा मृत्यू

दुचाकी अपघातात बालकाचा मृत्यू

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क 

पालघर, दि. 27 : धुकटन-बहाडोली फाट्यावर दुचाकी अपघातात दोन महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून महिला व 2 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सेल्वास येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 
विक्रमगड येथील रहिवाशी असलेले रणजीत पागी हे शनिवार दि, 26 जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून पालघरच्या दिशेने येत होते. पालघर-मनोर रस्त्यावर धुकटन -बहाडोली फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आल्याने त्यांनी त्वरित ब्रेक लावला. यातून झालेल्या अपघातात 2 महिन्यांच्या बाळाला घेऊन बसलेली त्यांची पत्नी आशा व दुसरा 2 वर्षीय मुलगा राजवीर रस्त्यावर फेकले गेले. त्याचवेळी पाठीमागून येणार्‍या एका कारने या तिघांनाही चिरडले.
या अपघातात 2 महिन्याच्या आरुषचा जागीच मृत्यू झाला असून राजवीर व त्याची आई गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम पालघर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्यानंतर पुढील उपचारासाठी सेल्वास येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top