दिनांक 23 February 2019 वेळ 8:40 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » वसईत कारशेडला आगे, 100 गाड्या जळून खाक

वसईत कारशेडला आगे, 100 गाड्या जळून खाक

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
वसई, दि. 27: येथील टॅब कॅब कंपनीच्या कारशेडला लागलेल्या आगीत तब्बल 100 गाड्या जळून भस्मसात झाल्या आहेत. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली असून सुदैवाने घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. हे कारशेड वसईत मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत एका खुल्या जागेवर आहे. 
वसई पूर्वेला ससूननगरमधील मालाजी पाडा भागात हे कारशेड आहे. या कारशेडला शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास आग लागली. याची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणली. आगीचं कारण मात्र अद्याप कळलेलं नाही. कारशेडच्या सुरक्षेसाठी कुणीही तैनात केलेले नसल्याची माहिती समोर येत आहे.
आगीत जळालेल्या सर्व कार या टॅब कॅब कंपनीच्या आहेत. कारशेडमध्ये नादुरुस्त झालेल्या गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. याआधी विरारमध्ये 17 जानेवारीला अशीच आग लागली होती. विरार पूर्वेतील काणेर पोलीस चौकीच्या मागे जप्त केलेल्या गाड्यांना आग लागली होती. यात अनेक गाड्या जळून भस्मसात झाल्या होत्या.
 
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top