दिनांक 25 August 2019 वेळ 2:31 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू : खूनाच्या गुन्ह्यात २ आरोपींना शिताफीने अटक

डहाणू : खूनाच्या गुन्ह्यात २ आरोपींना शिताफीने अटक

RAJTANTRA MEDIA

डहाणू दिनांक २६: रस्त्याच्या कडेला मुक्काम ठोकणाऱ्या आरोपीची पत्नी व मुलगी झोपलेल्या ठिकाणी बाजूला चटई टाकून झोपलेल्या मजूराला रागाच्या भरात मारहाण करुन ठार करणाऱ्या आरोपींना पकडण्यात डहाणू पोलीसांना यश आले आहे. हकीम पवार (३५) व रोहित चव्हाण (१९) अशी आरोपींची नावे आहेत.

डहाणू येथील एसटी डेपोच्या बाहेरील बाजूस मणी, शंख विक्री करणारे आरोपी व त्यांच्या कुटूंबीयांचा पडाव होता. त्याच ठिकाणी रोजंदारी करणारा कैलास लोंढे देखील उघड्यावर रहात असे. १७ जानेवारी रोजी कैलास हा हकीम पवार ची पत्नी व मुलगी झोपलेल्या ठिकाणी बाजूला चटई टाकून बसला होता. त्यावर आरोपींनी इथे का चटई टाकली असा जाब विचारला व बाजूच्या लाकडी दांड्याने कैलासला मारहाण केली. जबर जखमी अवस्थेत कैलासला डहाणूच्या उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार घेत असताना कैलासचा मृत्यू झाला.

घटना घडल्यानंतर आरोपी गाशा गुंडाळून पळून गेले. ते भटके असल्यामुळे त्यांचा ठाव ठिकाणा शोधणे अवघड होते. मात्र त्यातील एका आरोपीने परिसरातील एका दुकानदाराचा मोबाईल वापरुन कोणाला तरी फोन केला होता. पोलीसांनी तो दुवा पकडून चौकशी सुरु केली असता त्यांचा जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे मुक्काम असल्याचे समजल्यावरुन डहाणू पोलीसांचे पथक तिथे जाऊन धडकले आणि आरोपी हाती लागले. दोन्ही आरोपींना आज (२६) न्यायालयासमोर हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर तपास करीत आहेत.

comments

About Rajtantra

Scroll To Top