दिनांक 06 April 2020 वेळ 3:28 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » प्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा

प्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेतर्फे सर्व तहसील कार्यालयांत आंदोलनाचा इशारा

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर, दि. २५: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला श्रमजीवी संघटनेने उद्या (२६) जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत श्रमजीवी संघटनेचे संस्थापक नेते विवेक पंडित यांनी भाजपसाठी काम केलेले असताना आता अचानक संघर्षाची भूमिका घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

श्रमजीवी संघटनेतर्फे आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे दावा केला आहे की, आदिवासींना भूकबळी आणि कुपोषणापासून वाचवण्यासाठी प्रत्येक आदिवासीला सरसकट 35 किलो धान्य, डाळ आणि खाद्यतेल देण्याबाबतची योजना श्रमजीवी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली होती व मुख्यमंत्र्यांनी या योजनेची जानेवारी 2019 पासून ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. हे कथित आश्वासन सरकारने पाळावे याकरिता श्रमजीवी संघटनेने उद्याचे आंदोलन पुकारले आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top