दिनांक 22 September 2019 वेळ 5:33 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वाड्यातुन अनेक दिंड्या निघाल्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना

वाड्यातुन अनेक दिंड्या निघाल्या त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना

3राजतंत्र न्युज नेटवर्क
वाडा, दि. २५ : संत निवृत्तीनाथांची यात्रा ३१ जानेवारी रोजी असते. त्यासाठी वाडा तालुक्यातुन पायी दिंड्या शुक्रवारी (दि. २५) नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. तालुक्यातुन ठिकठिकाणावरुन निघालेल्या दिंड्यातील वारकऱ्यांना भक्तीभावाने निरोप देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

वाडा तालुक्यातील मेट, देवघर ,नांदनी अंभरभुई, दिनकरपाडा, लोहपे, खानिवली, गुंज, अबिटघर, तिळसा, खरीवली, झिडके, या गावांसह पंधराहून अधिक दिंड्या निघाल्या आहेत. तालुक्यातील वातावरण भक्तीमय झाले असुन सर्वच रस्ते दिंड्यांनी फुल निघाले आहेत.
कोंढले विभागातील दिंडीमध्ये चारशेहून अधिक वारकरी सहभागी झाले असुन यामध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

तालुक्यातुन तीन हजारांच्या वर वारकरी निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रे निमीत्ताने त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले आहेत. सकाळी काकड आरती पासुन रात्री मुक्कामी कीर्तन जागर करत दिवसरात्र नामस्मरण करुन या दिंड्या गुरूवार (दि. ३१) पर्यंत त्र्यंबकेश्वर येथे दाखल होतील. यावर्षी तरूण-तरुणींचा दिंडी मध्ये वाढता सहभाग हा भारतीय संस्कृती जोपासण्याचा चांगला संकेत आहे. तरूण वर्ग भक्तीमार्गाला लागल्यामुळे त्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडून व्यसनापासून परावृत्त होतील असे कोंढले विभाग दिंडीचे प्रमुख बळीराम भेरे, बबन चौधरी, विलास भेरे, भास्कर दुबेले, परशुराम चौधरी यांनी सांगितले

कोंढले विभागातील दिंडीमध्ये विशेष आकर्षण ठरले ते आळंदी येथील ब्रम्हदेव महाराज, मतकर महाराज यांचा सहभाग. त्यांच्या भेटीसाठी भक्तगणांनी एकच गर्दी केली होती.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top