दिनांक 22 August 2019 वेळ 3:31 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » जव्हार : मतदार दिन उत्साहात साजरा

जव्हार : मतदार दिन उत्साहात साजरा

2राजतंत्र न्युज नेटवर्क
जव्हार, दि. 25-
सर्वांनी लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊन आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असे आवाहन पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी जव्हार येथे बोलताना केले. ते गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मतदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

नववा मतदार दिन आज जिल्हाभर उत्साहात साजरा करण्यात आला. जव्हार येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी यांनी महाविद्यालयीन युवक युवतींना तसेच नवमतदारांना मार्गदर्शन करीत सर्वांना मतदार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पहिल्यांदा मतदार नोंदणी केलेल्या युवकांचा सत्कार करून त्यांना बॅजेसचे वाटप करण्यात आले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील, जव्हारचे सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. किरण महाजन तसेच जव्हारचे तहसीलदार संतोष शिंदे आदी उपस्थित होते. महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच नागरिक उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top