दिनांक 06 April 2020 वेळ 3:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब

बोईसर: रासायनिक कारखान्याला आग ६ जण भाजले, सुरक्षिततेच्या नावाने बोंब

1वैदेही वाढाण
बोईसर, दि. २५:
तारापूर औद्योगिक परिसरातील ई-93 व 94 या प्लॉटमधील साळवी केमिकल इंडस्ट्रीज लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये आज पहाटे ड्रायरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीमध्ये ६ कामगार भाजून जखमी झाले आहेत. त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे.

या कारखान्यांमधील ड्रायरमध्ये रासायनिक प्रक्रिया सुरू असताना अचानक स्फोट झाला व त्याच दरम्यान विजपुरवठा खंडीत झाल्याने एकच गोंधळ माजला. कामगार सैरावैरा पळू लागले. आफताब आलम (28), मोहम्मद सोनू शाह (20 ), मुमताज शाह (19), नासिर साही (19), अन्वर साही (18), वसीम अक्रम (19) अशी जखमींची नावे असून या सर्वांवर बोईसर येथील डॉक्टर कुलकर्णी यांच्या आशीर्वाद रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील आफताब आलम च्या पायाला गंभीर इजा झाली आहे.

घटनास्थळी तारापूर अग्निशामक दलाच्या तीन गाड्या तर पालघर नगरपरिषद व बीएआरसी यांच्या प्रत्येकी एक अशा एकूण पाच गाड्यांच्या साहाय्याने आग नियंत्रणात आणली गेली. आग विझविण्याकरीता 20 लिटर क्षमतेच्या 10 फोमच्या कॅनचा वापर करण्यात आला. आजूबाजूच्या कंपनीत आग पसरू नये याकरिता दोन गाड्या पाठीमागच्या बाजूस तैनात ठेवण्यात आल्या होत्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली.
नेहमीप्रमाणेच दुर्घटना घडल्यानंतर आता कारखाना निरीक्षक चौकशीचे सोंग करायला सज्ज झाले आहेत.
Attachments area

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top