दिनांक 06 April 2020 वेळ 3:48 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्‍या शेतकर्‍यांसोबत सकारात्मक चर्चा

सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणार्‍या शेतकर्‍यांसोबत सकारात्मक चर्चा

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर दि. 24 : सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस विरोध करणारे शेतकरी, एमएमआरडीए आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पार पडली. बैठकीत शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी खासदार राजेंद्र गावित, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, उपवनसंरक्षक भिसे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता हनुमंत सोनावणे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे दिनेश अग्रवाल, आदिवासी पुनर्वसन आंदोलनाचे अविनाश पाटील, सूर्या पाणी बचाव संघर्ष समितीचे पुंडलिक घरत, सरपंच आणि शेतकरी उपस्थित होते.

महामार्गावरील हालोली, वाडा खडकोना आणि दुर्वेस गावातील शेतकर्‍यांनी पाणीपुरवठा योजनेसाठीच्या खोदकामास आक्षेप घेतला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकरी तसेच वनपट्टे धारकांना संपादित जमिनीचा मोबादला तातडीने द्यावा, पाणीपुरवठा योजने लगतच्या गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा जोडणी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी पाणीपुरवठा योजनेचे काम अनेकदा बंद पाडले होते. 11 जानेवारीला दुर्वेस गावात आंदोलन करणार्‍या पाच शेतकर्‍यांवर मनोर पोलीस स्टेशनला आयपीसीच्या 353 कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शेतकर्‍यांवरील अन्यायाच्या निषेधार्थ 17 जानेवारीला सूर्या पाणी बचाव संघर्ष समिती मार्फत मनोर पोलीस स्टेशनवर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता.

वन विभागाच्या परवानगी शिवाय एमएमआरडीएने काम सुरू करू नये. तसेच भूसंपादन प्रक्रिया नव्याने राबवून शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला सुधारित कायद्यानुसार देण्यात येईल.एमएमआरडीए मार्फत महामार्गाच्या हद्दीबाहेर काम केल्याने झालेली नुकसानभरपाई शेतकर्‍यांना द्यावी. तसेच आपल्या हद्दीबाहेर काम करू नये. पाणीपुरवठा योजनेलगतच्या गावांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा देण्याचे एमएमआरडीएने मान्य केले. तसेच एमएमआरडीएने स्थानिक उत्तरदायित्व निधीचा वापर करून महामार्गालगतच्या गावात विकासकामे करावी अशा सुचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या. शेतकर्‍यांवर दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत पालघरच्या पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा करून मार्ग काढण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी जाहीर करीत, शेतकर्‍यांना पाणीपुरवठा योजनेच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले.

येत्या शुक्रवारी डहाणूच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेतील अपूर्ण भूसंपादन पूर्ण करण्यासाठी, तसेच शेतकर्‍यांच्या वैयक्तिक समस्या सोडविण्यासाठी शेतकरी आणि संबंधित अधिकारी यांच्यात बैठक आयोजित करण्यात केली जाईल असेही जिल्हाधिकारी यांनी जाहिर केले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top