दिनांक 21 July 2019 वेळ 5:54 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत वृद्धाचा मृत्यू; चौघांना अटक

क्षुल्लक कारणावरून झालेल्या हाणामारीत वृद्धाचा मृत्यू; चौघांना अटक

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
वाडा, दि. 24 : अंगणात कचरा टाकला म्हणून जाब विचारायला गेलेल्या वृद्धाला चार जणांनी लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत ढकलून दिल्याने 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील परळी या गावात बसंतीलाल छगनलाल जैन (72) यांच्या शेजार्‍यांनी गुरुवारी सकाळच्या सुमारास अंगणात कचरा टाकला म्हणून ते जाब विचारायला गेले असता मुर्‍हे कुटुंबियानी एकत्र येऊन त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली व ढकलून दिले. त्यात बसंतीलाल यांचं डोकं दगडावर आपटून त्यांचा मृत्यू ओढवला. या बाबत वाडा पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 302, 323, 504, 506 व 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी शैला अनंता मुर्‍हे, अनंता लक्ष्मण मुर्‍हे, सुषमा गणेश मुर्‍हे व अनिल लक्ष्मण वड यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद बोराडे तपास करीत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top