दिनांक 18 November 2019 वेळ 2:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बाळासाहेब ठाकरे जयंती निमीत्त रक्तदान

बाळासाहेब ठाकरे जयंती निमीत्त रक्तदान

Shivsena Raktadanराजतंत्र न्युज नेटवर्क
जव्हार, दि. 24 : दिवंगत शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रम व रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात आले. श्रीराम मंदिर येथे पतंगशहा कुटिर रूग्णालयासाठी रक्तदान शिबीरात रक्त संकलीत करण्यात आले. रक्तदानाला शहरातील तरुणांनी व शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. यावेळी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. दिनकर पढेर उपस्थित होते. पतंगशहा कुटिर रुग्णालयातील रूग्णांना शिवसेना जिल्हाप्रमुख राजेशभाई शहा यांच्या हस्ते ब्लँकेटचे देखील वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रफुल्ल पवार, तालुका प्रमुख श्रावण खरपडे, शहर प्रमुख परेश पटेल, उपशहर प्रमुख साईनाथ नवले, नरेंद्र प्रभू, अनिल दवणे व शिवसेना महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top