दिनांक 23 April 2019 वेळ 5:55 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » बोईसर कला क्रिडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

बोईसर कला क्रिडा महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Boisar Kala Kridaराजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर दि. 24: महाराष्ट्र स्पोर्ट्स एज्युकेशन अ‍ॅकेडमी (तारापूर), बोईसर एज्युकेशन सोसायटी व डॉन बोस्को स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या शानदार कला व क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन विधान परिषदेचे आमदार आनंद ठाकूर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी महाराष्ट्र एज्युकेशन अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष संजय पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, बोईसर एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार वर्तक, डॉ. के. मुदस्सर, कामगार उपायुक्त शिरीन लोखंडे, विराज ग्रुपचे वरिष्ठ अधिकारी दीपक भावे, जे. एस. डब्ल्यू स्टिलचे वरिष्ठ अधिकारी तथा महाराष्ट्र एज्युकेशन अ‍ॅकेडमीचेकार्याध्यक्ष डेरेल डिमेलो, बिपीन पाटील, प्रशांत संखे, गजानन देशमुख, अतुल देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. 24 ते 27 जानेवारी दरम्यान चालणार्‍या या महोत्सवाचे हे 14 वे वर्ष आहे.

परिसरातील मुलांच्या कला क्रिडा गुणांना या महोत्सवामुळे प्रोत्साहन मिळून त्यांना राष्ट्रीय स्तरावर जाण्याची संधी मिळते. हे काम गेली 14 वर्षे संजय पाटील आणि त्यांचे सहकारी अविरतपणे करताहेत. त्याचे फळ म्हणजे आज 18 हजार विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. संजय पाटील व त्यांच्या सहकार्‍यांचे कौतुक करावे तितके कमी आहे.
– आनंद ठाकूर, आमदार

ग्रामीण भागातील मुलांना पुढे जावून आपले कर्तृत्व दाखविण्यासाठी हा फार मोठा प्लॅटफॉर्म आहे. तो उपलब्ध केल्याबद्दल संजय पाटील व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांचे अभिनंदन.
– प्रवीण पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी

आम्ही कला क्रीडा स्पर्धेचा उपक्रम सुरु केला तेव्हा 900 मुले सहभागी झाली होती. आज 14 वर्षांमध्ये ही संख्या 18,000 वर गेली आहे. आज 125 शाळांचा या उपक्रमात सहभाग असतो व एकूण 63 प्रकारचे कला व क्रीडा प्रकार इथे केले जातात.
– संजय पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र एज्युकेशन अ‍ॅकेडमी

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top