दिनांक 25 May 2019 वेळ 11:26 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक

आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला लाच घेताना अटक

 

LOGO-4-Onlineराजतंत्र न्युज नेटवर्क
 जव्हार दि. 23 : जव्हार तालुक्यातील न्याहळे शासकीय माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक नंदकुमार देवराम मोरे (52) व लिपिक पुंडलिक कचरू दळवी (53) यांना एका शिक्षिकेकडून 1 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. तक्रारदार महिला न्याहळे शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षिका असून तिचा सहा महिन्याचा पगार काढण्यासाठी आरोपींनी लाच मागितली होती. शिक्षिकेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यानंतर उप अधिक्षक अजय आफळे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला व आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे पुढील तपास करीत आहेत.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top