दिनांक 20 June 2019 वेळ 4:30 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » आपण समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे-प्रसाद कुलकर्णी

आपण समाजाप्रती कृतज्ञ असले पाहिजे-प्रसाद कुलकर्णी

Palghar SDSMराजतंत्र न्युज नेतवर्क 

पालघर दि. 23 : आपण रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपले जगणं विसरत चाललो आहोत. सकारात्मक विचार करुन आनंदी रहावे, अनेक चांगल्या गोष्टींचा स्वच्छंदपणे आस्वाद घ्यावा आणि निरोगी रहावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी व साहित्यिक प्रसाद कुलकर्णी यांनी पालघर येथे बोलताना केले. ते सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या मराठी वाड्.मय मंडळातर्फे विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक संघ (तारापूर) यांच्यासाठी आयोजीत आनंद यात्रा या कार्यक्रमात बोलत होते.

आयुष्यात आपल्याला दैवाने व समाजाने खुप सार्‍या गोष्टी दिलेल्या आहेत. समाजाप्रती आपण सदैव कृतज्ञ असले पाहीजे. आपली कर्मे सदैव चांगली असली पाहीजेत असेही विचार प्रसाद कुलकर्णी यांनी मांडले. या व्याख्यानात त्यांनी मंगेश पाडगावकरांच्या अनेक कवितांचे सादरीकरण केले. तसेच शेरो- शायरी, किस्से सांगून व्याख्यानात रंग भरला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव प्रा. अशोक ठाकूर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. विवेक कुडू यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी महाविद्यालयाचे आभार मानले. यावेळी ज्येष्ठांतर्फे सुरेश के. सावे, सुजाता सावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात प्रा. विवेक कुडू यांनी स्व-लिखित चोपी ही कथा सादर करुन ज्येष्ठांना एका वेगळया जगात नेले. संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, कनिष्ठ महाविद्यालय कार्यकारीणी समितीचे अध्यक्ष धनेशभाई वर्तक, सदस्य धराधर पाटील, अमिता राऊत तसेच हरेश्वर दा. सावे, उदयन सावे, केसरीनाथ सावे, निरज राऊत, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम पाटील, अनंत पाटील इ. मान्यवर प्रसाद कुलकर्णी यांच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी सुभाष मेस्त्री, सदानंद सावे यांच्याबरोबर ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top