दिनांक 18 June 2019 वेळ 6:28 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांना आदरांजली

Palgharराजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर दि. 23 : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्ताने शिवसेना व पालघर प्रतिष्ठानतर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. 23 जानेवारी ते 27 जानेवारी दरम्यान अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
24 जानेवारी रोजी शहरात कचर्‍याचे साम्राज्य वाढू नये यासाठी आणि स्वच्छ व सुंदर पालघरचा संकल्प घेऊन कचरा कुंड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. तर 25 जानेवारी रोजी आरोग्य शिबिर, 26 जानेवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅम्प फायर आणि 27 जानेवारी रोजी लहान मुलांची क्रीडा व वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली आहे. आजच्या आदरांजली कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश शहा, पालघर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील महेंद्रकर, ममता चेंबूरकर, ज्योती मेहेर, राजेश कुटे, श्वेता देसले, अंकिता तरे, वैभव संखे, विकास मोरे, मौलाना हाजीत खुर्शीत, भूषण संखे, अनुजा तरे, मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top