दिनांक 23 February 2019 वेळ 8:45 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » वाकसई येथे महिला लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शन व मेळावा

वाकसई येथे महिला लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शन व मेळावा

ZP Palgharराजतंत्र न्युज नेटवर्क 
पालघर दि. 23: जिल्हा परिषदेचा महिला व बालकल्याण विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांच्यातर्फे वाकसई ग्रामपंचायतीमध्ये पंचायत राज समितीमधील महिला लोकप्रतिनिधींसाठी मार्गदर्शन व मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य योगेश पाटील, गावचे सरपंच उपेश घरत, ग्रामपंचायत सदस्य, महिला लोकप्रतिनिधी, जि प शाळेचे शिक्षक, ग्रामस्थ आणि महिला बचत गट उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रकल्पाधिकारी दिपक पिंपळे यांनी केले. राजमाता जिजाऊ ट्र्स्ट च्या जिल्हा समन्वयक शिल्पा अडेलकर यांनी महिलांना ’बेटी बचाव बेटी पढाव’ याविषयी मार्गदर्शन केले. टाटा ट्स्ट चे डॉक्टर अजय यांनी उपस्थितांना निरोगी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले. आरोहन संस्थेच्या जयश्रीताई यांनी उपस्थितांना स्वच्छतेचा मंत्र दिला. तसेच ग्राममंगल संस्थेचे ऋषभ निकम यांच्या मार्गदर्शनाखाली बालनगरी भरवण्यात आली. निकम यांनी प्राथमिक शिक्षणाची अंगणवाडीतील आवश्यकता याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top