दिनांक 21 April 2019 वेळ 3:57 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणार्‍या ट्रकला अपघात ट्रक जळून खाक, चालक जागीच ठार

हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणार्‍या ट्रकला अपघात ट्रक जळून खाक, चालक जागीच ठार

IMP Apaghatडहाणू दि. 22: गुजरात मुंबई महामार्गावर चारोटी येथील पुलावर हायड्रोजन गॅसचे सिलेंडर वाहतुक करणार्‍या ट्रकला अपघात झाला असून अपघातात लागलेल्या आगीमुळे ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे. या अपघातात ट्रक चालक जागीच जळून मृत्यूमुखी पडला आहे.

भरोडा ते तळोजा येथील श्री जी कार्बोनिक कंपनीचा हा हायड्रोजन गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक आज दुपारी 4 वाजताच्या सुमारास वाजताच्या सुमारास कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या चारोटी पुलावर पलटला. या अपघातानंतर ट्रकने पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. गॅस सिलेंडर असल्याने त्याचा भडका उडणे व आग लागण्याचे प्रकार चालूच होते. दक्षता म्हणून पोलिसांनी 200 मीटर परिसरात जाण्यास मज्जाव केला होता. ट्रकचा चालक अवत बिहारी याचा अपघातात जळून मृत्यू झाला आहे. घटनास्थळी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व अग्निशामक दल आग आटोक्यात आणण्यासाठी उशिरा पर्यंत प्रयत्न करत होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top