दिनांक 09 December 2019 वेळ 11:25 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » प्राणिशास्त्राकडे सकारात्मकतेने पहावे- डॉ. संजय भागवत

प्राणिशास्त्राकडे सकारात्मकतेने पहावे- डॉ. संजय भागवत

SDSMपालघर,दि. 22 : विद्यार्थ्यांनी प्राणिशास्त्र विषयाकडे सकारात्मकतेने पहाण्याची गरज असून मधुमक्षीका पालन, दुग्धप्रकल्प, शेळीपालन, कोळंबी प्रकल्प, शोभिवंत माशांचे प्रजनन व विक्री, जैवमाहिती तंत्रज्ञान व व्यवस्थापन, पर्यावरणीय अहवाल बनविणे अशा विविधी क्षेत्रात रोजगार व उद्योगाच्या संधी आहेत, त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन प्राणिशास्त्रज्ञ डॉ. संजय भागवत यांनी पालघर येथे बोलताना केले.

सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात प्राणिशास्त्रातील संशोधन आणि रोजगाराच्या संधी या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेस यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे संचालक आणि प्राणिशास्त्रज्ञ डॉ. संजय भागवत प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
संशोधन कसे केले जाते, विविध जीवांवर संशोधन करुन त्यातून औषध निर्मिती करुन कशाप्रकारे पेटन्ट बनवून त्यापासून फायदा मिळवला जाऊ शकतो हया संबंधी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अंती भागवत सरांनी प्राणिशास्त्र विभागाला पुस्तकांचे संच भेट दिले.

ह्या कार्यशाळेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी केले. प्राचार्य डॉ. सावे यांनी संशोधनक्षेत्रातील संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. सोनोपंत दांडेकर शिक्षण संस्थेचे सचिव प्राध्यापक अशोक ठाकूर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाने आयोजित केलेल्या विविध कार्यशाळांचा पुरेपुर लाभ घेऊन आपला जास्तीत जास्त उत्कर्ष साधावा असे आवाहन केले. यावेळी प्राणिशास्त्र विभागप्रमुख प्रा. सीमा देशमुख, प्रा. अस्मिता राऊत, प्रा. विवेक पुराणीक, डॉ. बाळासाहेब रहाणे व निवृत्त प्राणिशास्त्र विभागप्रमुख प्रा. शरद चौधरी व इतर प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भुषण भोईर यांनी केले. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा

comments

About Rajtantra

Scroll To Top