बोईसर, दि .२१ : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील के झोन परिसरात रात्रीच्या सुमारास विषारी वायु मिश्रित घटक रासायनिक सांडपाणी सोडल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य औद्योगिक व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे चौकशी सुरु केली असून सांडपाणी नेमके कुठल्या कारखान्यातून सोडण्यात आले याबाबत तपास चालू आहे.
शनिवारी रात्री तारापूर औद्योगिक क्षेत्रातील के झोन परिसरात पावसाळ्यातील पुराचे पाणी वाहून नेणाऱ्या गटारात रात्रीच्या सुमारास विषारी वायुमिश्रित घातक रसायनिकसांडपाणी सोडल्याने आजूबाजूच्या कंपन्यातील शेकडो कामगारांना व रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास झाला होता. डोळ्याची जळजळ,डोळे लाल होणे, श्वसनास त्रास, उलटी इत्यादी प्रकारचे त्रास होऊ लागले होते व त्यामुळे अनेक्कमगारांना कमसोडून घरीं जावे लागले होते.
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!