दिनांक 21 October 2019 वेळ 3:29 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » डहाणू तालुक्याला 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

डहाणू तालुक्याला 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का

RAJTANTRA MEDIA

डहाणू दिनांक 20: आज सायंकाळी डहाणू तालुक्याला जोरदार भूकंपाचे झटके बसले. पहिला झटका सायंकाळी 6.39 वाजता बसला. त्यानंतर काही क्षणात लोकांना आणखी आणखी धक्के जाणवले असले तरी प्रशासनाकडून मात्र एकच धक्का बसल्याचे सांगण्यात आले. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहिती नूसार आज (रविवार) सायंकाळी 6.39 वाजता अक्षांश 20° व रेखांश 72.9 या भौगोलिक स्थानावर 3.6 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा बिंदू भूगर्भात 12 किलोमीटर खोल असून हा भौगोलिक बिंदू कासा, दापचरी व आशागड या त्रिकोणात असल्याचे गूगल मॅप वरुन स्पष्ट होत आहे.

लोकांना भूकंपाचे धक्के जाणवत असले तरी धुंदलवाडी येथे बसविलेल्या भूकंपमापन यंत्रात त्याची नोंद होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. आजच्या धक्क्यात अनेक घरांना तडे गेल्याचे समोर आले असले तरी भूगर्भतज्ञंच्या मते 3.6 रिश्टर स्केल ही धोक्याच्या खालील पातळी आहे.

comments

About Rajtantra

Scroll To Top