दिनांक 21 October 2019 वेळ 2:46 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » प्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ

प्रजासत्ताक दिनी पालघर येथे 9.15 वाजता मुख्य शासकीय समारंभ

राजतंत्रच न्यूज नेटवर्क
पालघर, दि. 15 : भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ कोळगावमधील पोलीस परेड मैदानावर सकाळी 9.15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे-पाटील यांनी केले आहे. प्लास्टिक ध्वजांचा वापर टाळावा तसेच ध्वज रस्त्यावर टाकले जाणार नाहीत, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत डुबे-पाटील बोलत होते. या कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहता यावे यादृष्टीने सकाळी 8.30 ते 10 वाजेदरम्यान इतर कोणताही शासकीय अथवा अर्धशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नयेत, असे त्यांनी यावेळी सांगितले. उपजिल्हाधिकारी (सामान्य) संभाजी अडकुणे, उपविभागीय अधिकारी विकास गजरे, तहसीलदार उज्वला भगत, महेश सागर यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक तसेच देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून संचलनात विविध विभागांचे चित्ररथ सहभागी होणार आहेत. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी, स्काऊटचे विद्यार्थी देखील संचलनात भाग घेणार आहेत. दरम्यान यावेळी लोकशाही पंधरवड्यानिमित्त जनजागृती करण्यात येऊन निवडणुकांमध्ये वापरण्यात येणार्‍या व्हीव्हीपॅट मशीनची माहिती दिली जाणार आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top