दिनांक 21 April 2019 वेळ 4:17 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

वाड्यात गड किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

WADA GAD KILLEराजतंत्र न्यूज नेटवर्क
वाडा, दि. 15 : महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकिल्ल्यांची आजच्या पिढीतील लहानग्यांना माहिती व्हावी, या गडकिल्ल्यांचा इतिहास त्यामागील अपार मेहनत व अनेकांचे त्यासाठी सांडलेले रक्त या सर्वांविषयी आदर निर्माण व्हावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेऊन वाडे शहरातील पी.डी.एस. युथ फाउंडेशन या संस्थेने गड किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या निकाल रविवारी जाहीर झाला ज्यात किल्ले हरिहर गडाची प्रतिकृती उभारलेल्या सूचित गंधे व सार्थक गंधे यांना प्रथम पारितोषिक देण्यात आले.

वाडे शहरात झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थी व दुर्गप्रेमींचा चांगला प्रतिसाद लाभला ज्यात 47 स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेत चुरस निर्माण केली होती. परीक्षक व मान्यवर पाहुणे म्हणून दुर्ग अभ्यासक व महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समितीचे सचिव डॉ. सचिन जोशी उपस्थित होते. त्यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी वाडा शहरात हा सोहळा पार पडला. या सोहळ्यात सूचित गंधे व सार्थक गंधे यांना प्रथम पारितोषिक, स्नेहल डेंगाणे, मिहीर कोकणे व आर्यन कोकणे यांना द्वितीय, अभिषेक शेलार तृतीय तर चैतन्य राऊत व गुरुनाथ तरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. यावेळी विजेत्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी छत्रपतींचे दुर्ग या विषयी व्याख्यान देऊन डॉ. सचिन जोशी यांनी उपस्थितांची मनं जिंकली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top