दिनांक 21 October 2019 वेळ 2:38 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » कांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे

कांदळवनासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घ्या! – निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे

KANDLAVAN TAKRARIराजतंत्र न्युज नेटवर्क
पालघर, दि. 14 : पालघर जिल्ह्यातील कांदळवनाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेऊन आलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे यांनी दिले.
वसई, पालघर, डहाणू, तलासरी या तालुक्यांमधील कांदळवनासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त तक्रारींचा आढावा डॉ. जरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. डहाणू वनविभागाचे उप वन संरक्षक विजय भिसे, पालघरचे सहायक वन संरक्षक पी. एस. पवार, विविध तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार खाजगी जागेवरील कांदळवन राखीव वने म्हणून घोषित करण्याची प्रक्रीया सुरू आहे. तसेच 2005 साली जेथे कांदळवन होते त्यापासून पुढे 50 मिटर क्षेत्र बफर झोन असल्याने त्याठिकाणी कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, अशा सूचना त्यांनी यावेळी देण्यात आल्या.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top