दिनांक 18 June 2019 वेळ 6:09 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » वारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर

वारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर

JILHA SWATCHTA JAGARपालघर, दि. 15 : ग्रामीण भागात वारकरी संप्रदाय आणि संतसाहित्याचा मोठा प्रभाव असून याद्वारे सामाजिक प्रबोधन केल्यास ते अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सहकार्य मिळेल, असे मत पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागा मार्फत आयोजित कार्यशाळेत व्यक्त केले.

पालघर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता आणि महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2019 या कालावधीत स्वच्छतेचा जागर उपक्रम राबविण्यात येणार असुन यानिमित्ताने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाश्वत स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छता सुविधांची देखभाल दुरुस्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ओला आणि सुका कचरा वर्गीकृत करावा, प्लास्टिक बंदी व प्लॅस्टिकचे धोके आणि परिसर स्वच्छतेचे महत्व या विषयांवर प्रवचनकार गाव- पाड्यांमध्ये प्रबोधन करणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि शाळांचे मुख्याध्यापक यांच्या सहकार्याने गावकरी आणि विद्यार्थी यांना प्रवचन कार्यक्रम राबविण्यात येईल अशी माहिती ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुषार माळी यांनी दिली.

स्वच्छतेच्या घरी लक्ष्मी वास करी हा मंत्र घरा-घरात पोहोचवण्यासाठी सर्व प्रवचनकार स्वच्छतेचा जागर उपक्रम राज्यातील 44 हजार गावांमध्ये राबविणार आहेत, अशी माहिती राज्य वारकरी साहीत्य परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. विठ्ठलजी महाराज पाटील यांनी यावेळी दिली. यामध्ये एक प्रवचनकार रोज दोन गावांमध्ये प्रवचन करतील, प्रवचनानंतर उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना स्वच्छतेचा संकल्प करता येईल, असेही ते म्हणाले. आम्हाला दिलेली जबाबदारी आम्ही् पूर्णपणे पार पाडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी वारकरी साहित्य परिषदेचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष पांडुरग महाराज पाटील, वारकरी संप्रदायचे प्रतिनिधी आदि अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

स्वच्छता सुविधांचा नियमित वापर व ग्रामीण कुटुंबांकडून स्वच्छता सवयींचा शाश्वत अंगीकार होणे यासाठी वारकरी संप्रदायाच्या सहाय्याने जनजागृती करून स्वच्छ आणि सुंदर पालघर निर्मितीच्या कार्याला गती मिळेल असा विश्‍वास मुख्य कार्यकारी अधिकारी बोरीकर यांनी यावेळी व्यक्त केला.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top