दिनांक 22 September 2019 वेळ 5:04 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » महिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या! जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव

महिला बचत गटांना महावितरणाची कंत्राट पद्धतीची कामे द्या! जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत माविम अध्यक्षांचा ठराव

MAVIM KARYALAY1वार्ताहर
बोईसर, दि. 15 : रीडिंग घेणे, बिलं तयार करणे, महावितरणची अशी कंत्राट पद्धतीची कामे शासनाच्या आदेशानुसार महिला बचत गटांना देण्यात यावी असे ठरले असताना अनेक भागात महिला बचत गटांना ही कामे मिळालेली नाहीत. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सर्व भागात महावितरणने कंत्राटी पद्धतीची कामे महिला बचत गटांना द्यावीत, असा महत्वपुर्ण ठराव महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी काल, सोमवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडला.

पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत पालघर जिल्ह्याच्या 2019-20 या वर्षाच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 461 कोटी 41 लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली. यावेळी माविम अध्यक्षा ठाकरे यांनी सुर्या पाणीपुरवठा योजनेला होत असलेला विरोध व मच्छीमार बांधवांच्या मागण्यांबाबत चर्चा करत मच्छीमार बांधवांनी काल, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्च्यात महिलांना मासे विक्रीसाठी जागा देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी मान्य करुन भाजीपाला विक्रेत्या व मासेविक्रेत्या महिलांना मुख्य बाजारपेठेत सरकारने हक्काची जागा द्यावी तसेच सुर्या प्रकल्प बाधित शेतकर्‍यांना मोबदला व या प्रकल्पाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

त्याचप्रमाणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट यांनी विरार येथे असलेले पालघर जिल्ह्याचे आरटीओचे कार्यालय जव्हार येथे स्थलांतरीत करण्याची मागणी केली. तर वाडा नगरपंचायतीसाठी आलेला चार कोटींचा निधी वाटप करण्यासाठी पुरेसा अधिकारी वर्ग नसल्याने अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे रिक्त असलेली पदे तातडीने भरण्यात यावी, असे आमदार शांताराम मोरे यांनी सांगितले. आमदार अमित घोडा यांनी पाटबंधारा विभागांतर्गत असलेले नादुरुस्त रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी केली.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top