दिनांक 20 March 2019 वेळ 9:06 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » कुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव

कुडूसच्या तलाठ्यांना श्रमजीवींचा घेराव

>> 7/12 उतारे, विविध दाखले व इतर कागदपत्रे वेळेत मिळत नसल्याने घातला घेराव 

SHRAMJIVI AANDOLANप्रतिनिधी/वाडा, दि. 14 : तालुक्यातील कुडूस तलाठी सजेच्या तलाठी सिमा सांबरे-पष्टे या शेतकर्‍यांना 7/12 उतारे, विविध प्रकारचे दाखले व इतर कागदपत्रे देण्यासाठी वारंवार कार्यालयात हेलपाटे मारायला लावत असल्याचा आरोप करत या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ आज दुपारी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालून जाब विचारला. श्रमजीवीचे नेते मिलींद थुले व सरिता जाधव यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. यावेळी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयात जोरदार घोषणाबाजी केली.

वाडा तालुक्यातील कुडूस, चांबळे, डोंगस्ते व देवघर या चार तलाठी सजांचा कार्यभार तलाठी सांबरे सांभाळतात. डोंगस्ते सजा सोमवार, कुडूस सजा मंगळवार, देवघर सजा बुधवार व चांबळे सजा गुरूवार तसेच संगणक, इतर फिरती कामे शुक्रवार व वाडा तहसील कार्यालय शनिवार, असे तलाठी सांबरे यांच्या कामाचे वेळापत्रक आहे. मात्र वार व्यतिरिक्त इतर सजांची कामे करण्यास त्या स्पष्ट शब्दांत नकार देतात असा आरोप श्रमजीवी कार्यकर्त्यांनी करीत या मनमानी कारभारामुळे नागरिकांची महत्त्वाची कामे रेंगाळली जात आहेत. आज चांबळे येथील सुरेखा शशिकांत पाटील 7/12 उतारा घेण्यासाठी आल्या असता त्यांना उद्या सातबारा देण्यात येईल, असे सांगण्यात आले. तर देवघर येथील नशीब पाटील, मोरेश्वर पाटील, दयानंद निपुर्ते, डोंगस्ते येथील गोपाल पवार, सिताराम पवार, लोहोपे येथील निर्मला पाटील, बाबु पाटील आदी परिसरातील अनेक शेतकरी, शेतमजुरांना 7/12 देण्यास दिरंगाई करून वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने तलाठी सिमा सांबरे यांना घेराव घालण्यात आला. कामानिमित्त आलेल्या नागरिकांची कामे ताबडतोब करा, अन्यथा कार्यालयाबाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेत आंदालेकांनी कार्यालयात ठाण मांडल्याने येथील वातावरण चांगलेच तापले होते. अखेर मंडळ अधिकारी भोईर यांनी हस्तक्षेप करुन उपस्थित नागरिकांना 7/12 उतारे तत्काळ दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात श्रमजीवी संघटनेचे कल्पेश जाधव, दिलीप चौधरी, दिलीप भानुशाली आदी पदाधिकार्‍यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top