सागरी अतिक्रमणाविरोधात मच्छीमार बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

0
4

MACHIMAR BANDHAV MORHCAवार्ताहर/बोईसर, दि. 14 : इतर भागातील मच्छीमारांचे पालघर जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रातील अतिक्रमण रोखावे या मुख्य मागणीसह आपल्या विविध मागण्यांसाठी दमण ते दातीवरे मच्छीमार धंदा संरक्षण समितीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दहा हजाराच्यावर मच्छीमार बांधव या मार्चात सहभागी झाले होते.

पारंपरीक मासेमारी व्यवसायाप्रमाणे प्रत्येक मच्छीमाराने आपल्या सागरी हद्दीतील 12 नॉटिकल अंतरापर्यंत कव पद्धतीने मासेमारी करायची असा नियम असताना वसई उत्तनच्या मच्छीमारांनी 1980 सालापासून पालघर तालुक्यातील सातपाटी हद्दीपर्यंत कवीचे खुंट रोवून मासेमारी सुरू केली होती. मात्र यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर असे कव काढून टाकण्याचे आदेश लवादाने दिले होते. मात्र या आदेशाला न जुमानता वसई, उत्तन व अर्नाळाच्या मच्छीमारांनी पालघर, दातीवरे, कोरे, केळवे, माहीम, वडराई, दांडी, डहाणू, झाई, उंबरगाव, दमण व जाफराबादपर्यंत कवीचे खुंट मारून सर्व जागा काबीज केली आहे. त्यामुळे या भागातील दालदा, वागरा, मगरी व तरसी पद्धतीने मासेमारी करणार्‍या मच्छीमारांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम झाला असुन अशा मच्छीमारांवर उपसमारीची वेळ आली आहे. त्यातच मोठे मच्छीमार ट्रॉलरच्या सहाय्याने अवैधरित्या पर्सनीक पद्धतीने मासेमारी करून लहान मच्छीमारांवर घाला घालण्याचे प्रयत्न करत असल्याने येथील मच्छीमार हतलब झाले आहेत.

त्यामुळे याविरोधात आज दमणसह पालघर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येत उत्तन, वसई, अर्नाळा व मड या भागातील मच्छीमारांकडून होणारे सागरी अतिक्रमण रोखावे, अवैधरित्या होणारी पर्सनीक मासेमारी बंद करावी, मच्छीमारांना डिझेल खरेदीवर शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याकडून न मिळालेला कर लवकरात लवकर मिळावा, पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांच्या किनार्‍यालगत असलेल्या मच्छीमार वस्तीतील घरांच्या जमिनीचे सातबारा उतारे शासन निर्णयानुसार मिळावेे, पालघर जिल्ह्यातील मच्छी विक्री करणार्‍या महिलांना मासळी मार्केटसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशा अनेक मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

[divider]

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

 

Print Friendly, PDF & Email

comments