दिनांक 21 February 2020 वेळ 1:24 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » अहिंसेच्या मार्गा शिवाय पर्याय नाही! -मुक्ता दाभोळकर

अहिंसेच्या मार्गा शिवाय पर्याय नाही! -मुक्ता दाभोळकर

MUKTA DABHOLKARप्रतिनिधी
वाडा, दि. 13 : कितीही संताप आला तरी तो संविधानाच्या मार्गानेच व्यक्त व्हायला हवा, असे सांगतानाच अहिंसेच्या मार्गा शिवाय पर्याय नसल्याचे मत महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोळकर यांनी वाडा येथे आयोजित डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (डी. वाय. एफ. आय.) च्या 11 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

येथील पटारे हॉल येथील सभागृहात 11 ते 13 जानेवारी दरम्यान डी.वाय.एफ.आय.चे 11 वे राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. मुक्ता दाभोळकर म्हणाल्या कि, नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येनंतर हजारो लोक रस्त्यावर उतरले मात्र कुठेही मोडतोड, जाळपोळ अथवा हिंसात्मक घटना घडली नाही. आमचा संविधानावर पूर्ण विश्वास असल्याने दाभोळकरांच्या हत्येच्या तपासात प्रगती होताना दिसते आहे. आज शिक्षण, रोजगार, कुपोषण, आरोग्य आदी गंभीर समस्यांकडे सरकार गांभीर्याने बघत नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्या दिवशी शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीचे सभेत रूपांतर झाल्यानंतर उपस्थित कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करण्यात आले. आताचे सरकार हे अंबानी, अदानींचे असून या सरकारने सामान्य जनतेला दिलेल्या अश्वासनांपैकी एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. तर वाढत्या महागाईमुळे सामान्यांचे जगणेही मुश्किल झाले आहे. म्हणून या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याची गरज असल्याचे परखड मत यावेळी उपस्थित किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक ढवळे व मरियम ढवळे यांनी मांडले. डी.वाय.एफ.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद रियाज, महासचिव अवैय मुखर्जी, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनील धानवा, राज्य महासचिव प्रीती शेखर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top