दिनांक 21 January 2019 वेळ 4:47 PM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत अत्याचार पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण उजेडात, दोन आरोपींवर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत अत्याचार पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने प्रकरण उजेडात, दोन आरोपींवर गुन्हा दाखल

LOGO-4-Onlineप्रतिनिधी
मनोर, दि. 13 : मनोर नजीकच्या बोट गावातील अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन शारीरिक संबंध ठेवल्याने पीडित मुलगी गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला असुन मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार मनोर पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्गावरील बोट गावातील पिडीत मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तिच्याच गावातील महिलेने आपल्या ड्राइवर मित्रासोबत पिडीत मुलीस शारीरिक संबध ठेवण्यास भाग पाडले. पुढे दुर्वेस गावच्या जंगलातील झोपडीत आरोपीने मुलीशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवल्याने अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. वैद्यकीय अधिकार्‍यांनी अल्पवयीन मुलगी ही पाच महिन्याची गर्भवती असल्याचे सांगितल्यानंतर तिच्या पालकांनी बोट गावातील वैशाली दांडेकर आणि महादेव यांच्या विरोधात मनोर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यानुसार आरोपींवर भारतीय दंड विधानाच्या कलम 376, 370 आणि लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण (पोस्को) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला आरोपीस अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी पालघर जिल्ह्याबाहेरील असल्याने त्याचा शोध सुरू आहे, असे मनोर पोलिसांनी सांगितले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top