दिनांक 27 May 2019 वेळ 6:54 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात विद्यार्थीनींच्या आरोग्यविषयक कार्यशाळा संपन्न महिला विकास कक्षाचा अभिनव उपक्रम

कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात विद्यार्थीनींच्या आरोग्यविषयक कार्यशाळा संपन्न महिला विकास कक्षाचा अभिनव उपक्रम

LOGO-4-Onlineराजतंत्र न्यूज नेटवर्क
तलासरी, दि. 13 : दि. 1 : कॉम्रेड गोदावरी परुळेकर महाविद्यालयात महिला विकास कक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि. 11) विद्यार्थीनींच्या आरोग्यासंदर्भात एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. मुलींच्या आरोग्यविषयक सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर योग्य ते उपचार करुन मुलींच्या सदृढ आरोग्याविषयी महिला विकास कक्ष व एल. अ‍ॅन्ड टी. कंपनीच्या चॅरीटेबल ट्रस्टमार्फत 6 महियाचा आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे यावेळी निश्चीत झाले. त्याचाच भाग म्हणून स्त्रीरोग तज्ञ डॉ. दिपा मुनगी, आहारतज्ञ डॉ. आत्मजा राजे या नामांकित डॉक्टरांना एल. अ‍ॅन्ड टी. मार्फत कार्यशाळेस निमंत्रित करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या 300 हून अधिक विद्यार्थीनी या कार्यशाळेत उपस्थित होत्या.

प्रथम प्राचार्य डॉ. बी. ए. राजपूत यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून एल. अ‍ॅन्ड टी. चॅरीटेबल ट्रस्टच्या रुचा पत्की यांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पत्की यांनी विद्यार्थीनींना आरोग्यविषयक बहुमोल मार्गदर्शन करुन येत्या सहा महिन्यांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थीनींच्या सर्व समस्या जाणून घेऊन योग्य ते उपचार करण्याबद्दल आश्वासीत केले. डॉ. दिपा मुनगी यांनी मुलींकडून त्यांचे सर्व प्रश्‍न लिखित स्वरुपात प्राप्त करुन घेतले. यातील बहुतेक प्रश्‍न मुलींच्या मासिक पाळी संदर्भात होते. दरम्यान, डॉ. दिपा व डॉ. आत्मजा यांनी मुलींच्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे तपशीलवार देऊन मुलींचे समाधान केले. या कार्यशाळेनंतर लगेचच विद्यार्थींच्या आरोग्य चाचण्या घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. यावेळी महिला विकास कक्षाच्या प्रतिनिधी प्रा. निलिमा ओझरे, प्रा. संध्या धामोडे, प्रा. दिपिका कुवरा तसेच महाविद्यालयाचे उप-प्राचार्य व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top