दिनांक 21 February 2020 वेळ 12:18 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील

निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद -प्रकाश पाटील

SHIVSENA MELAVA1वाडा, दि. 13 : कोणत्याही पदाची अभिलाषा न बाळगता निष्ठेने पक्षाचे काम करणे म्हणजेच शिवसैनिक. एखादे पद आज आहे तर उद्या नाही परंतु निष्ठावंत शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद असल्याचे मत हातमाग विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे ठाणे ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी तालुक्यातील चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात आयोजित केलेल्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले.

पालघर उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील व तालुका प्रमुख उमेश पटारे यांच्या संकल्पनेने वाडा तालुक्यातील सर्व शिवसेना पदाधिकारी, अंगीकृत संघटना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व गटप्रमुखाचा मेळावा रविवार (दि. 13) रोजी चिंचघर येथील ह. वि. पाटील विद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या वर्षात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूका व तालुक्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामांचा आढावा या मेळाव्यात घेण्यात आला.

SHIVSENA MELAVA2या मेळाव्यात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांनी महामंडळामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांची माहिती देऊन त्याबाबत मार्गदर्शन केले. तर भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे व पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश गंधे यांनी आपल्या कालावधीत झालेल्या व होणार्‍या विकास कामांसंदर्भात माहिती दिली. मेळाव्या दरम्यान प्रथम एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीने इयत्ता 4 थी नंतर व 10 पर्यंत शिक्षण घेऊ न शकणार्‍या बेरोजगारांना कसे प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते याबद्दल चित्रफितीद्वारे माहिती दिली.

या मेळाव्यामध्ये शिवसेनेचे वसई – नालासोपारा – विक्रमगड विधानासभेचे नवनियुक्त सह समन्वयक गोविंद पाटील, वाडा तालुका समन्वयक प्रकाश केणे, तालुका संघटक अरुण अधिकारी, तालुका सचिव निलेश पाटील, वाडा शहर प्रमुख नरेश चौधरी, हिंदूस्थान कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष अभिजीत केणे तसेच वाडा नगर पंचायतीच्या विषय समित्यांवर निवडून आलेले संदीप गणोरे, जागृती काळण व शुभांगी धानवा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मेळाव्यास वाड्याच्या नगराध्यक्षा गितांजली कोलेकर, उप नगराध्यक्षा उर्मिला पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक वैष्णवी रहाणे, उपजिल्हा संघटक संगिता ठाकरे, जिल्हा परिषद सदस्य किर्ती हावरे, पंचायत समिती सदस्य नरेश काळे, स्नेहा जाधव, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी, युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top