दिनांक 21 February 2020 वेळ 12:53 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » किनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न!

किनिस्ते येथे शेतकरी मेळावा व महिला प्रशिक्षण वर्ग संपन्न!

>> बायफ, सिमेंस व आसमंतचा संयुक्त उपक्रम

MOKHADA SHETKARI MELAVAप्रतिनिधी/मोखाडा, दि. 13 : तालुक्यातील किनिस्ते येथे बायफ संस्था आणि सिमेंस आशा जव्हार प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा पंचायत समितीचे सभापती प्रदीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो शेतकर्‍यांनी या मेळाव्याचा लाभ घेतला.

या मेळाव्यासाठी पंचक्रोशीतील कारेगांव, कडूचीवाडी, कोचाळे, काष्टी, सावर्डे, उधळे, कामडवाडी, वाकडपाडा, हट्टीपाडा, पोर्‍याचापाडा व गवळहरीपाडा येथून 254 शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने हजेरी लावली होती. यात महिलांची संख्या विशेष लक्षणिय होती. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहूणे म्हणून किनिस्ते ग्रामपंचायतीचे सरपंच चंद्रकांत शिंदे तर मार्गदर्शक म्हणून बायफचे प्रकल्प अधिकारी सचिन गिलके, जिल्हा कार्यक्रम अधिकारी आनंदा जाधव व आसमंत प्रतिष्ठानच्या सुनिता वझरे उपस्थित होत्या. यावेळी शेतकर्‍यांना शेती व शेतीविषयक योजनांची माहिती देण्यात आली.

दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून आसमंत प्रतिष्ठानच्या वतिने किनिस्ते येथील स्वयंसहाय्यत्ता महिला बचत गटांना इमिटेशन ज्वेलरी बनविन्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी 22 महिला बचत गटांमधून 150 महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. त्याचबरोबर महिला सक्षमिकरण, क्षमता बांधणी आदी विषयांवर धडे देत शाश्वत उपजिवीकेचे साधन कसे निर्माण करता येईल, याविषयी उद्बोधक विवेचनही आसमंतकडून करण्यात आले. परिसरातील 12 गांवांमधून 2500 महिलांना शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असून प्रत्येक महिलेला किमान 100 तर कमाल 150 रूपये रोजंदारी मिळण्याची तजविज होणार असल्याचे आसमंतकडून सांगण्यात आले.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top