दिनांक 12 December 2019 वेळ 10:36 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » किशोर मुसळे ट्रस्टतर्फे 250 विद्यार्थ्यांना सायकल वाटप

किशोर मुसळे ट्रस्टतर्फे 250 विद्यार्थ्यांना सायकल वाटप

CYCLE VATAPप्रतिनिधी
मनोर, दि. 11 : किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 9) वसई तालुक्यातील सायवणच्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात पार पडला.
सायवण आणि सावरे जिल्हा परिषद शाळेतील 250 विद्यार्थ्यांना सायकल बँक प्रकल्पांतर्गत वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. तत्पूर्वी सायवण जिल्हा परिषद शाळेतील इ लर्निंग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांसाठी दहा कॉम्पुटर असलेली कॉम्पुटर लॅब, इर्न्व्हर्टर तसेच लॅबसाठी एक पूर्णकालीन शिक्षिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शासनाने कारखान्यांना त्यांच्या नफ्यातील काही रक्कम सीएसआर फंडामार्फत स्थानिक परिसर विकासासाठी खर्च करण्याचे बंधनकारक केले आहे. परंतु किशोर मुसळे यांनी असे बंधन येण्याआधी सीएसआरचा निधी पालघरच्या ग्रामीण आणि आदिवासी बहुल क्षेत्रात वापरून मोठे काम उभे केले आहे. ही अभिमानाची बाब असल्याचे मत हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त करीत अर्ध्यावर शिक्षण राहिलेल्या व्यक्तींना शाळा सुटल्यानंतर अधिकचा वेळ देत कॉम्प्युटर शिक्षण द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.यिा वर्षात पालघर जिल्ह्यात एकूण पाच हजार सायकल वाटप करण्याचा मनोदय ट्रस्टचे अध्यक्ष किशोर मुसळे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच महामार्गानजीक तीन एकर जागेत भव्य इनोव्हेशन सेंटर उभारून येथे पालघर जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांना प्रशिक्षित करून त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मुसळे यांनी संगीतले.
यावेळी बोईसरचे आमदार विलास तरे, माजी खासदार बळीराम जाधव, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्या कल्याणी तरे, वसई पंचायत समितीचे माजी सभापती राजेश पाटील, सायवणचे सरपंच गणेश जाधव, वसई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. राजेश जोगदंड, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपेंद्र सोनटक्के यांनी तर आभार प्रदर्शन सायवण जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी केले.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

comments

About Rajtantra

Scroll To Top