दिनांक 18 June 2019 वेळ 6:14 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » मनोरच्या गावदेवी तलावाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

मनोरच्या गावदेवी तलावाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन

MANOR TALAV SUSHOBHIKARANप्रतिनिधी
मनोर, दि. 11 : मनोरच्या गावदेवी तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार विलास तरे यांच्या हस्ते आज, शुक्रवारी (दि.11) करण्यात आले.
आमदार तरे यांनी आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी याकामी उपलब्ध करून दिला. मनोर ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावाची दुरावस्था झाली होती. आता सुशोभीकरणा अंतर्गत तलावाला संरक्षण भिंत उभारण्यात येणार आहे. तसेच तलावा भवती जॉगिंग पार्क निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे, असे मनोरचे उपसरपंच कैफ रईस यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी सरपंच पौर्णिमा दातेला, जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील, पंचायत समिती सदस्य श्रद्धा घरत, माजी ग्रामपंचायत सदस्य रातनदीप एडवणकर, समाजसेवक प्रशांत घोसाळकर, रुपेश घरत, संजय मळेकर, समीर मुल्ला, विनोद चंपानेकर तसेच मनोर ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

comments

About Rajtantra

Scroll To Top