दिनांक 20 June 2019 वेळ 5:22 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » 16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा!

16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा लवीनो कपूर कारखान्यावर मोर्चा!

1राजतंत्र न्युज नेटवर्क
बोईसर, दि. 11 : गेल्या महिन्याभरापासुन आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणास बसलेल्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील (एमआयडीसी) लवीनो कपूर कारखान्यातील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या 16 जानेवारीला स्थानिक भूमिपुत्रांचा मोर्चा कारखान्यावर धडकणार आहे.
लवीनो कपूर हा वैद्यकीय क्षेत्रात वापरल्या जाणार्‍या कापसांच्या वस्तुचे उत्पादन घेणारा कारखाना असुन या कारखान्यांमध्ये गेल्या 30 ते 40 वर्षांपासुन काम करणार्‍या पाच स्थानिक कामगारांना व्यवस्थापकाने तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे सदर कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे या मुख्य मागणीसह आपल्या इतर मागण्यांसाठी कारखान्यातील तीनशे ते चारशे कामगारांनी गेल्या महिन्याभरापासुन कारखान्याच्या गेटबाहेर शांततेने काम बंद आंदोलन छेडले आहे. या काम बंद आंदोलनाला सर्वच राजकीय पक्षातील पदाधिकार्‍यांनी पाठिंबा देऊन तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन देखील दिले. मात्र कारखाना प्रशासनाने आडमुठी भुमिका घेत कामावरुन काढून टाकलेल्या 3 कामगारांना कामावर घेण्याचे मान्य करत इतर 2 कामगारांना पुन्हा कामावर घेण्यास नकार दिला आहे. येथील कामगारांच्या श्रमिक उत्कर्ष सभा युनियनने यावर तोडगा निगावा म्हणून कामगार आयुक्तांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली असता या बैठकीकडे देखील कंपनीच्या व्यवस्थापकाने दुर्लक्ष करत गैरहजर राहिल्याचे कामगारांनी सांगितले. अखेर कंपनीच्या या आडमुठीपणा विरोधात सर्व पक्षांसह स्थानिक भूमिपुत्रांनी भव्य मोर्चा काढण्याचे ठरविले असून प्रत्येक गावातील नागरिक या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कामगार वर्गाची पिळवणूक व अन्याय करणार्‍या लवीनो कपूरमधील ठेकेदार व व्यवस्थापनाविरुद्ध सर्वसामान्य जनतेत तीव्र संताप असुन या मोर्च्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आल्याने कामगारांचे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top