दिनांक 22 September 2019 वेळ 5:53 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » वाडा : अल्पवयीन मुलीवर दोघांचा पाशवी बलात्कार

वाडा : अल्पवयीन मुलीवर दोघांचा पाशवी बलात्कार

MANOR APHARANप्रतिनिधी/वाडा, दि. 11 : शाळेतून घरी परतणारी 14 वर्षीय मुलगी एकटीच असल्याचे हेरुन तिच्यावर दोन नराधमांनी सामुहिक बलात्कार केल्याची घटना वाडा येथे घडली असुन या घटनेने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

तालुक्यातील खैरे गावात राहणारी पिडीत मुलगी आठवी इयत्तेत शिकत असुन काल (दि. 10) सायंकाळी शाळा सुटल्यानंतर ती घरी परतत असताना ती रस्त्याने एकटीच असल्याचे पाहून दोन जणांनी आरडाओरड केला तर जिवे ठार मारेन, अशी धमकी देत शेजारील शेतात नेले व आळीपाळीने पाशवी बलात्कार केला.

दरम्यान, याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात वाडा पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेचे कलम 376 (ड), 506 व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दोघेही नराधम गावातीलच तरुण असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन पोलीसांनी त्यादिशेने तपास सुरु केला आहे.

आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top