दिनांक 20 March 2019 वेळ 8:33 AM
Breaking News
You are here: Home » ताज्या बातम्या » स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात चित्रकला स्पर्धा आणि महास्वच्छता रॅली

Swatch Missionराजतंत्र न्यूज नेटवर्क
पालघर, दि. 10- : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशभर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. राज्यात 29 मोठ्या शहरांमध्ये (महानगरपालिका क्षेत्र) हे अभियान राबविण्यात येत असून पालघर जिल्ह्यात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात 11 आणि 12 जानेवारी 2019 या कालावधीत याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानास सर्वांनी प्रतिसाद द्यावा आणि स्वच्छतेबाबत लोकजागृती करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे यांनी केले.
महास्वच्छता अभियानाबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, केंद्र सरकारचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या अभियानात 100 शाळा सहभागी होणार आहेत. या शाळांमध्ये दि. 11 जानेवारी रोजी चित्रकला स्पर्धा तर दि. 12 जानेवारी रोजी प्रभात फेरी आयोजित केली जाणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या सहभागातून नागरीकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेतून उत्कृष्ट ठरणारी चित्रे राज्यस्तरावर आयोजित होणार्‍या चित्र प्रदर्शनात पाठविली जातील. दि. 12 जानेवारी रोजी शाळा परिसराची स्वच्छता करण्यात येऊन स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात येईल. त्यानंतर प्रभात फेरीच्या माध्यमातून स्वच्छता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीच्या उद्घाटनासाठी लोकप्रतिनिधींना तसेच पालकांना देखील निमंत्रित केले जाणार असून त्यात विद्यार्थी परिसरातील दुकानदार, नागरीक यांना स्वच्छता राखण्याबाबत विनंती करतील.
महाराष्ट्र हे देशासाठी नेहमीच पथदर्शी राज्य राहिले आहे. या अभियानास देखील सर्वांचा उत्तम प्रतिसाद लाभून विशेषत: पालघर जिल्ह्यात हे अभियान निश्चित यशस्वी होईल, असा विश्वास डॉ. जरे यांनी यावेळी व्यक्त केला.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top