दिनांक 30 May 2020 वेळ 8:45 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » पालघर येथे महाआरोग्य तपासणी शिबिरात 114 रूग्णांवर शस्त्रक्रिया

पालघर येथे महाआरोग्य तपासणी शिबिरात 114 रूग्णांवर शस्त्रक्रिया

AAROGYA SHIBIRराजतंत्र न्यूज नेटवर्क
पालघर, दि. 10 : पालघर ग्रामीण रूग्णालय येथे 7 ते 10 जानेवारी 2019 या कालावधीत दंत व महाआरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये तपासणीसाठी आलेल्या तसेच नुकतेच कासा येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरातील अशा एकूण 114 रूग्णांवर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. तर, मोठ्या स्वरूपाच्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया असलेल्या 23 रूग्णांना डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, नेरूळ, नवी मुंबई येथे संदर्भित करण्यात आले.
ग्रामीण रूग्णालय पालघर येथे झालेल्या शस्त्रक्रियांमध्ये 46 रूग्णांवर दंतशल्यचिकित्सा करण्यात आली तर इतर शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या 68 रूग्णांमध्ये 41 मुले आणि 27 प्रौढ व्यक्तींचा समावेश होता. या शिबिरात डॉ.डी.वाय.पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील जनरल सर्जन डॉ. कैलास जवादे, बालशल्यचिकित्सक डॉ.नंदिता सक्सेना, तसेच डॉ.दिनेश गोयल यांच्यासह इतर 17 तज्ज्ञ डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी शस्त्रक्रिया केल्याची माहिती ग्रामीण रूग्णालय, पालघरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. डी. गावित यांनी दिली.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top