दिनांक 20 March 2019 वेळ 8:18 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा प्रत्येक विद्यार्थ्याने अनुभव घ्यावा! -निलेश गंधे

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा प्रत्येक विद्यार्थ्याने अनुभव घ्यावा! -निलेश गंधे

VIDYAN PRADARSHANराजतंत्र न्युज नेटवर्क
बोईसर, दि. 10 : विज्ञान प्रदर्शनातील उल्लेखनीय प्रयोगाचे प्रात्यक्षिके सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखविण्यात यावेत जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल, असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि जिल्हा शिक्षण समितीचे सभापती निलेश गंधे यांनी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. तालुक्यातील सर्व शाळांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी गंधे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या मनातील वैज्ञानिक जिज्ञासा वाढीस लागावी, त्यांच्या मनात विज्ञानविषयक कुतूहल निर्माण व्हावे, शाळेत शिकवल्या जाणार्‍या वेगवेगळ्या वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन हे महत्वाची भूमिका पार पाडत असते. यामधूनच भावी वैज्ञानिक निर्माण होण्यास मदत होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी याप्रसंगी केले.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग व बोईसरमधील तारापूर विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 44 वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दि. 10 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांचे 96 आणि शिक्षकांचे 8 असे एकूण 114 स्टॉल उभारण्यात आले आहे. या प्रदर्शनात शेतीपूरक, रस्ता सुरक्षा, सौर ऊर्जा वापर, पवनऊर्जा, कृषी अवजारे, पाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, गणितीय व भौमितीय सिद्धांतांचा आधार घेत विविध प्रयोगांचे सादरीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षण अधिकारी प्राथमिक राजेश कंकाळ यांनी दिली. यावेळी विज्ञान प्रदर्शनासह पहिल्या दिवशी गणित कार्यशाळा, दुसर्‍या दिवशी पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघ आयोजित वकृत्व स्पर्धा आणि तिसर्‍या दिवशी पाणी व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती धनश्री चौधरी, समाज कल्याण सभापती दर्शना दुमाडा, कृषी सभापती अशोक वडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सदस्य सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्य मिताली राऊत, जिल्ह्यातील विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top