दिनांक 18 June 2019 वेळ 6:21 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » पालघर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी शिवसेनेचा पाठपुरावा रेल्वे बोर्ड अध्यक्ष विनोद कुमार यांना दिले निवेदन

पालघर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी शिवसेनेचा पाठपुरावा रेल्वे बोर्ड अध्यक्ष विनोद कुमार यांना दिले निवेदन

LOGO-4-Onlineवार्ताहर
बोईसर, दि. 10 : गेल्या 16 वर्षांत पालघर रेल्वे स्थानकात कोणत्याही लांब पल्ल्याच्या गाडीला थांबा मिळालेला नाही. त्यामुळे पालघर जिल्हा प्रमुख राजेश शहा यांनी सतत पाठपुरावा करून खासदार अरविंद सावंत यांच्यामार्फत दिल्ली येथे रेल्वे बोर्ड अध्यक्ष विनोद कुमार यांना पालघर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा, अशा मागणीचे निवेदन दिले.
पालघर जिल्ह्यातील पालघर रेल्वे स्थानक जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणावरील स्थानक आहे. गेले अनेक वर्षे पालघरमध्ये वेगवेगळ्या प्रांतांमधील लोक नोकरी निमित्त स्थायिक झाले आहेत. यामध्ये मुस्लिम, जैन, यांसारखे नागरिक व्यापारानिमित्ताने पालघरमध्ये स्थायिक झाले आहेत. तसेच नोकरी निमित्ताने अनेक नागरिक पालघर मधुन मुंबई, वापी या ठिकाणी ये-जा करत असतात. मात्र वांद्रे उदयपूर एक्स्प्रेस, वांद्रे सुरत इंटरसिटी एक्स्प्रेस व वांद्रे श्री माता वैष्णवदेवी कतरा एक्स्प्रेस, स्वराज्य एक्स्प्रेस, गुजरात एक्स्प्रेस यांसारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर येथे थांबत नसल्याने मुस्लिम व जैन समाजाने या गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी मागील अनेक वर्षांपासुन मागणी करून देखील थांबा मिळत नसल्याने पालघर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राजेश शहा यांनी सर्व खासदार व आमदारांसह रेल्वे विभागात पाठपुरावा करून आज शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी दिल्ली येथील रेल्वे बोर्ड अध्यक्ष विनोद कुमार यांची भेट घेऊन सदर गाड्यांना थांबा मिळावा यासाठी निवेदन दिले. त्यामुळे लवकरात लवकर लांब पल्ल्यांच्या गाड्यांना पालघर स्थानकात थांबा मिळेल, असा विश्वास निर्माण झाला आहे.
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top