दिनांक 20 June 2019 वेळ 5:00 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » गतिमंद विद्यार्थी झाले योगात दंग! आंतरराष्ट्रीय योग गुरू श्रीचंद्र भंडारी यांनी दिव्यांगाना दिले योगाचे धडे

गतिमंद विद्यार्थी झाले योगात दंग! आंतरराष्ट्रीय योग गुरू श्रीचंद्र भंडारी यांनी दिव्यांगाना दिले योगाचे धडे

GATIMAND VIDYARTHI YOGAप्रतिनिधी
मोखाडा, दि. 10 : जव्हारमधील श्री गुरुदेव बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गतिमंदांसाठी दिव्य विद्यालयात शिक्षण दिले जाते. या विद्यालयाला आंतरराष्ट्रीय योग गुरू श्रीचंद्र भंडारी व हरिद्वार येथील त्यांचे शिष्य विनायक त्यागी यांनी भेट देत गतिमंद व दिव्यांग विद्यार्थ्यांना योग, प्राणायाम आणि मर्मा उपचाराचे धडे दिले आहेत. कडाक्याच्या थंडीतही गतिमंद आणि दिव्यांग विद्यार्थी यावेळी दंग होऊन, प्रात्यक्षिके करीत आपले स्वास्थ उत्तम ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.
योग गुरू श्रीचंद्र भंडारी व विनायक त्यागी यांनी नुकतीच जव्हारच्या गतिमंद विद्यार्थ्यांच्या दिव्य विद्यालयाला भेट दिली. या भेटीत त्यांनी येथील दिव्यांगाचे आरोग्य उत्तम रहावे म्हणून विद्यार्थ्यांना आठ दिवस योग, प्राणायाम आणि मर्मा उपचाराचे धडे दिले तसेच मार्गदर्शन केले. रोज सकाळी 7 ते 9 या वेळेत ही प्रात्यक्षिके सुरू होती. ऐन कडाक्याच्या थंडीतही गतिमंद आणि दिव्यांग मोठ्या उत्साहाने, योग आणि प्राणायामात दंग होऊन प्रात्यक्षिके करत होते. श्रीचंद्र भंडारी यांनी पोलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कंबोडिया, युनायटेड अरब देश, आणि लिथेनिया या देशांचे राजदूत म्हणून पद भूषविलेले आहे.
आमच्या दिव्य विद्यालयात 136 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये 46 अंध आणि 90 विद्यार्थी गतिमंद आहेत. योग गुरू श्रीचंद्र भंडारी व विनायक त्यागी यांच्या प्रशिक्षणामुळे हे विद्यार्थी प्राणायाम आणि सुर्यानमस्कार करत आहेत. त्यांचेे आरोग्य उत्तम रहाण्यास मदत होणार आहे.
– प्रमिला कोकड,
संस्थापिका दिव्य विद्यालय, जव्हार.
मला चालता येत नव्हते. मात्र योगा, प्राणायाम आणि मर्मा उपचाराने मला आता चालता येऊ लागले आहे.
– ओंकार गायकवाड,
मतिमंद विद्यार्थी
आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top