दिनांक 18 June 2019 वेळ 7:01 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » ताज्या बातम्या » मनोर रस्ता रुंदीकरणाच्या कामास विलंब रस्त्यावरून चालणे झाले अवघड

मनोर रस्ता रुंदीकरणाच्या कामास विलंब रस्त्यावरून चालणे झाले अवघड

RASTA RUNDIKARAN VILAMBप्रतिनिधी
मनोर, दि. 9 : येथील मुख्य रस्त्यापासून नावझे गावाला जोडणार्‍या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामा करिता ठेकेदाराने रस्त्याच्या कडेला टाकलेली खडी काम अनेक दिवसांपासुन बंद असल्याने रस्त्यावर पसरल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला असुन ग्रामस्थांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे.

वरई सफाळे मार्गाला नावझे गावाशी जोडणार्‍या रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला गेल्या वर्षी मंजुरी मिळाली आहे. या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे यासाठी ग्रामपंचायतीने पालघरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार केला होता आणि आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर ठेकेदाराने रस्त्याच्या कामास सुरुवात करताना रस्त्यालगत खडी टाकली. मात्र बरेच दिवस उलटूनही प्रत्यक्ष रस्त्याच्या कामास सुरुवात झालेली नाही. या कालावधीत रस्त्याच्या कडेला टाकलेल्या खडीतील दगड रस्त्याच्या मध्यभागी पसरल्याने रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे.

नावझे गावाला जोडणार्‍या रस्त्याच्या नूतनीकरणास मंजुरी मिळून एक वर्ष पूर्ण झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ठेकेदाराला कार्यादेश देखील मिळाला आहे. परंतु ठेकेदाराने प्रत्यक्ष कामास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे कामास विलंब करणार्‍या अशा ठेकेदारावर योग्य ती कारवाई करुन रस्त्याच्या कामास तातडीने सुरुवात करावी व रस्त्यावर आलेल्या दगडामुळे ग्रामस्थांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, आदी मागण्या नावझे गावचे ग्रामस्थ करीत आहेत.

नावझे गावातील ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये यासाठी रस्त्याच्या नूतनीकरणाच्या कामास तातडीने सुरवात करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात येतील. कामास दिरंगाई करणार्‍या ठेकेदारास जाब विचारला जाईल.
-महेंद्र किणी, उपविभागीय अभियंता.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघ
नावझे गावच्या रस्त्याच्या नूतनीकरणास तातडीने सुरूवात केली पाहिजे आणि ग्रामस्थांची गैरसोय दूर केली पाहिजे. कार्यादेश मिळुन वर्ष झाले आहे. तरीही रस्त्याच्या कामास विलंब करणार्‍या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा आंदोलन करण्यात येईल.
-रणजित ठाकूर,
उपसरपंच, नावझे ग्रामपंचायत

 
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top