दिनांक 20 May 2019 वेळ 11:54 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » भावेश देसाईंवर गोळीबार प्रकरणी, डहाणूतील व्यापाऱ्यांनी पुकारला 12 जानेवारी रोजी बंद

भावेश देसाईंवर गोळीबार प्रकरणी, डहाणूतील व्यापाऱ्यांनी पुकारला 12 जानेवारी रोजी बंद

RAJTANTRA MEDIA

दि. 9: डहाणूचे नगरसेवक आणि डहाणूरोड जनता सहकारी बॅंकेचे संचालक भावेश देसाई यांच्यावर काल (8 जानेवारी) अज्ञात लुटारूंनी केलेल्या गोळीबार प्रकरणी व्यापारी संतप्त झाले असून येत्या 3 दिवसांत पोलीसांनी आरोपींना जेरबंद केले नाही, तर शनिवार, 12 जानेवारी रोजी डहाणू बंद चा इशारा देण्यात आला आहे. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस निरीक्षक परबकर यांची भेट घेऊन त्यांना जवळपास 100 व्यापाऱ्यांच्या सह्या असणारे निवेदन दिले. या निवेदनात हा इशारा देण्यात आला आहे.

देसाई मंगळवारी, रात्री ९ वाजताच्या सुमारास हॉटेल सरोवरच्या मागील बुद्धदेव नगर येथील निवासस्थानाकडे मोटारसायकलवरुन जात असताना त्यांना एका अज्ञात व्यक्तीने हातातील चिठ्ठी दाखवत पत्ता विचारला होता. देसाई चिठ्ठी पहात असतानाच आरोपीने देसाईंच्या डोळ्यात जळजळ होईल असा विषारी स्प्रे मारुन त्यांच्या हातातील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. देसाई यांनी प्रतिकार केल्यानंतर त्यांच्यावर पिस्तूलातून गोळीबार करण्यात आला. यातील एक गोळी देसाई यांना स्पर्शून गेली होती.

सुदैवाने या घटनेमध्ये देसाई यांना इजा झाली नसली तरी डहाणू पोलीसांची नाचक्की झाली आहे. 2018 या वर्षात डहाणूतून 6 पिकअप वाहने चोरीला गेली आहेत. त्यांचा छडा लावण्यात पोलीसांना यश आलेले नाही. त्यात अशी घटना घडल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top