दिनांक 21 January 2019 वेळ 5:53 PM
Breaking News
You are here: Home » Breaking » दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड

दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड

????????????????????????????????????

राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 9 : सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या माहिती व तंत्रज्ञान तसेच संगणकशास्त्र विभागातील आठ विद्यार्थ्यांची कँम्पस इन्टरव्ह्यूत इन्फोसिस व कॅपजेमिनी या कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. निकिता जाडाला, सपना झा, आकाश पाटील, मेहुल पामाळे या विद्यार्थ्यांची इन्फोसिस तर सुप्रीया पवार हिची कॅपजेमिनी या बहुराष्ट्रीय कंपनीत निवड झाली आहे. प्रिया द्विवेदी, हुमराबानो शेख, रोहीत बरनवाल यांची इन्फोसिस व कॅपजेमिनी या दोनही कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

या मुलाखती सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाच्या कँम्पसमध्ये झाल्या असून मुलाखतीच्या आयोजनासाठी प्रा. रश्मी वराडे, प्रा. जुईता राऊत यांनी विशेष योगदान दिले. तसेच माहिती तंत्रज्ञान व संगणकशास्त्र विभागातील सर्व शिक्षक सहकार्‍यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. जी. डी. तिवारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत दांडेकर, कोषाध्यक्ष हितेंद्र शहा, सचिव अतुल दांडेकर, पर्यवेक्षक प्रा. महेश देशमुख व डॉ. हर्षद वनमाळी यांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था व महाविद्यालयातर्फे त्यांचे अभिनंदन केले.

याआधी 2018-2019 या शैक्षणिक वर्षात आदित्य बिर्ला, भारतीय आयुर्विमा निगम, इन्फिगो लाईफ सायन्सेस, ल्युपिन, इन्फोसिस, कॅपजेमिनी, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, किमया स्टिल, अ‍ॅक्युरेक्स फार्मा, मॅक्लाईडस् आणि इतर अनेक नामांकित कंपन्या व आस्थापनांमध्ये मोठ्या प्रमाणात दांडेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top