दिनांक 18 June 2019 वेळ 6:05 AM
Breaking News
You are here: Home » Breaking » फिरते संगणक लैब ठरतेय आदिवासी तरूणांसाठी वरदान

फिरते संगणक लैब ठरतेय आदिवासी तरूणांसाठी वरदान

MOKHADA COMPUTER LAB1दीपक गायकवाड/मोखाडा, दि. 9 : एकलव्य स्वावलंबन ट्रस्ट व एकल ग्रामोत्थान फाऊंडेशन गारगांव (ता. वाडा) यांच्या संयुक्त विद्यमाने मोखाडा तालुक्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फिरती संगणक लॅब सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे औपचारिक उद्घाटन खोडाळा येथे नुकतेच करण्यात आले. या लॅबमुळे तळागाळातील होतकरू आदिवासी तरूणांचा मोठा फायदा होणार असून अवघ्या तीनशे रूपयात त्यांना घरबसल्या संगणकाचे शिक्षण घेता येणार आहे.

MOKHADA COMPUTER LABसंपूर्ण भारतभरात 21 ठिकाणी अशाप्रकारचे अद्ययावत फिरते संगणक कक्ष (वाहन) ट्रस्ट मार्फत देण्यात आले असून त्यापैकी एक वाहन महाराष्ट्रातून विशेषत्वाने मोखाडा तालुक्यासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे मोखाडा तालुक्याचे डिजीटल इंडियाच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे. इ. आठवीपासून पुढे अशा प्रकारे संगणक प्रशिक्षणाची अद्ययावत व्यवस्था ट्रस्टने अत्यल्प दरात उपलब्ध करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार शाळेच्या वेळेआधी आणि शाळेच्या वेळेनंतर संगणक प्रशिक्षणाचा हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे ट्रस्टचे अमित पाटील व उच्च शिक्षित प्रशिक्षक गंगाराम फसाळी यांनी सांगितले. पहिल्या फेरीत मौजे वाशिंद-1, राजेवाडी, गोमघर व दुसर्‍या फेरीत दुधगाव, वाशिंद-2, सप्रेवाडी तर तिसर्‍या फेरीत शेलमपाडा, सुर्यमाळ व केवनाळे आदी गावांमधून संगणक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून प्रत्येक गावातून 11 मुले व 7 मुलींची निवड करण्यात आली आहे. अशा प्रकारे संपूर्ण तालुकाच संगणकीयदृष्ट्या प्रशिक्षित करण्याचा ट्रस्टचा मानस असल्याचे अमित पाटील व फसाळी यांनी सांगितले. या फिरत्या संगणक कक्षामध्ये 9 संगणक असून अत्यंत अद्ययावत प्रकारचे वाहन मोखाडा तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले असून विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा बहूसंख्येने लाभ घेण्याचे आवाहन ट्रस्टने केले आहे.

 • संस्थेचे अन्य उपक्रम
  1) संगणक प्रशिक्षण.
  2) महिला सक्षमीकरण.
  3) टेलरींग कोर्स.
  4) पापड बनविणे.
  5) लोणचे बनविणे.
  6) कापडी पिशव्या बनविणे.

आदी उपक्रम विद्यार्थी आणि महिला बचत गटांसाठी राबविण्यात येत आहेत.

 • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
 • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
 • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!

comments

About Rajtantra

Scroll To Top